राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा येथे नियुक्त असलेले साहिल उमाकांत झरकर यांचे मुल येथे स्थानांतरण करण्यांत आले आहे. मुल येथील पदोन्नतीने नियुक्त झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे येत्या काही महिण्यांत सेवानिवृत्त होणार असून त्यांची राज्य आर्थिक गुन्हे शाखेत स्थानांतरण करण्यांत आले त्यांचे जागी झालें आहे.
नक्षलप्रभावीत गडचिरोली जिल्हयातील कुरखेडा पोलीस उपविभागात साहिल झरकर मागील दोन वर्षापासुन सेवारत होते. राज्य पोलीस सेवेत असलेले साहील झरकर शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्याती कमावलीअसून नक्षलप्रभावीत कुरखेडा उपविभागात त्यांची सेवा उल्लेखनिय राहीली आहे.
सध्यास्थितीत कुरखेडा उपविभागातंर्गत सुरू असलेल्या विविध गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी झरकर यांनी नवनवीन प्रयोग राबवून परिसरातील गुन्हेगारी वर आळा बसविला होता.
लवकरच साहील झरकर यांचे जागी नवनीयुक्त भोसले उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत.