राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
वडसा तालुक्यातील चिखली( तुकुम) येथील २५ च्या जवळ पास शेतकऱ्यांच्या शेतात २० ते२५ हत्तीच्या कळप घुसून उन्हाळी फसलीचे नुकसान केले.
यात उन्हाळी फसलीचे परे,रोवनी, कारले,मुंग, तुळी, टमाटर, वागी, या पिकांची अक्षरशः नासधूस केले.या बाबतची तक्रार चिखली येथील काही शेतकऱ्यांनी मोबाईल द्वारे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल याना केली.
त्याच क्षणी आज दिनांक ४/२/२०२४ ला दुपारी १ वाजता चिखली तुकुम येथील शेतकऱ्याच्या शेतात जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम, तालुका प्रमुख नंदु चावला,वडसा शहर प्रमुख विकास प्रधान,विभाग प्रमुख ठाकरे यांनी भेट दिली व नुकसानी ची पाहणी केली.
यात शेतकऱ्यांचे धान पिकाचे पऱ्हे, नुकताच केलेली धान पिकाची रोवणी, कारले, मूंग, या पिकांचे हत्तीच्या कळपाने नास धुस केलेली आहे. यात प्रती शेतकऱ्यांचे ७० ते८० हजार रुपयांचे पिकांचे नुकसान झाले आहे, वन विभागाच्या आर फ ओ फॉरेस्टर यांनी अजूनही भेट दिली नाही व नुकसानाची पंचनामा केलेला नाही.
तसेच काही शेतकऱ्यांनी गावातील दुसऱ्या शेतकऱ्यांचे शेती केली आहे तर ज्याने प्रत्येक्षात शेती केली आहे त्यांचे आजू बाजू च्या शेतकऱ्यांचे बयान घेऊन त्याला मदत द्यावी तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित भेट देऊन पाहणी करावी. प्रती शेतकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई तत्काळ द्यावी. अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम तालुका प्रमुख नंदु चावला शहर प्रमुख विकास प्रधान विभाग प्रमुख ठाकरे यांनी केली आहे.
या प्रसंगी चिखली (तुकम) येथील पोलीस पाटील सौ कुंदाताई नाकाडे, धनंजय परवते, शेखर नाकाडे, दुर्वास धोटे, उमेश मेश्राम, सुरेश भर्रे, खेमराज गाहाने, विठ्ठल खरकाटे, रुपचंद मेश्राम, अण्णाजी आंबोने, कुमार बुद्धे, व गावातील नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.