कसारी येथील आरोग्य शिबीरात ५५० रूग्नांची तपासणी व औषधोपचार तर ५० यूवकांचे रक्तदान…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधि 

            तालूक्यातील कसारी येथे आदिवासी गोटूल समीती,वन-जन-हक्क फांऊडेशन तथा मेडिट्रीना हास्पीटल व एच सी जी कैंसर रूग्नालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन आज दि ३ फेब्रूवारी शनिवार रोजी दूपारी १ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात आले होते शिबीरात एकूण ५५० रूग्नांची तपासणी व औषधोपचार करण्यात आले तर शिबीरात ५० यूवकानी स्वयंस्फूर्त रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.

           शिबीराचे उदघाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते करण्यात आले. शिबीरात रूग्नांची अनेमिया,अस्थिव्यंग,बालकफ, शल्यक्रिया, कर्करोग तपासणी तसेच सामान्य आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले तसेच मोफत विविध रक्त तपासणी,ईसीजी, शूगर तपासणी करण्यात आली.

         यावेळी नागपूर येथील डॉ.आशिष कोरेटी यानी मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्व विषद केले तसेच स्वस्थ जीवन जगण्याकरीता आरोग्याची निगा कशी राखावी ही माहिती विषद केली. तर डॉ.केशव वालके यानी व्यसनाचे दूष्परीणाम सांगत यापासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले. शिबीरात डॉ.आशिष कोरेटी, डॉ.प्रशिल उईके, डॉ. वेद सारंपूरे ,डॉ. देवेन्द्र मडावी, डॉ.प्रियंका सिडाम डॉ. अफीफा शेख, डॉ. कोसे, डॉ.शेडमाके, डॉ.नाकाडे, औषधनिर्माता श्रीकांत आतला ,मयूर कूमरे यानी सेवा बजावली.

        कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता आदिवासी गोटूल समीतीचे अध्यक्ष मिलिंद उईके व त्यांचा चमूने सहकार्य केले.