दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
दैनंदिन आहारातंर्गत भाज्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लसुणाचे भाव कडाडले असून चारशे रुपये किलो दराने विकले जात आहे.यामुळे दररोजच्या भाज्यांच्या (सब्जी) फोडणीमध्ये लसूणाचा उपयोग करणे गृहिणींना कठीण झाले आहे.
या देशात गोरगरिबांची उन्नती झाली अल्याची केंद्र सरकारची आकडेवारी गरीबांना खुणावते आहे व अपमानित करते आहे.तद्वतच ग्रामीण भागात सांजसकाळची संज कशी चालवायची व दैनंदिन आहारातंर्गत जीवनावश्यक वस्तूंचा वापर कसा करायचा हेच आवाक्याबाहेरचे झाले आहे.
कधी भाजीपाल्याचे भाव कडाडतात तर कधी तेलाचे,कधी कांद्याचे भाव गगनाला भिडतात तर कधी लसुणाचे भाव खरेदी करण्याच्या क्षमतेच्या पलिकडे असतात.
सध्या स्थित लसुण चारशे रुपये किलो दराने विकले जात असून हा भाव गरीब नागरिकांसाठी आवाक्याबाहेरचा आहे.
दैनंदिन फोडणीत मसालेदार पदार्थ असलेला लसूण नसला की सब्जी खाण्यात चव राहातं नाही.लसूण सब्जीला चव आणतो आणि अनेक रोगांवर नियंत्रण ठेवतो.म्हणून लसूण हा मसाला पदार्थ प्रत्येकांच्या घरचा महत्वपूर्ण खाद्य घटक झाला आहे.
लसूणाचा भाव आवाक्याबाहेरचा झाला असल्याने गृहिणी व नागरिक केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारवर संतापलेल्या असल्याचे चित्र आहे.