आदिवासींची विशिष्ट बोलीभाषा, संस्कृति व रितीरीवाजाचे जतन होणे समाजा करिता गरजेचे :- ना.धर्मराव बाबा आत्राम 

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

          आदिवासी समाजाची विशिष्ट बोलीभाषा, संस्कृति व रितीरीवाज आहे, आदिवासींची ही ओळख कायम राहण्याकरीता याचे जतन होने आवश्यक आहे याकरीता शाशनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यानी केले.

         क्षेत्रीय कोयतूर समाज संघटना येडापूर यांचा वतीने गावात आयोजित” भगवान बिरसा मुंडा” यांचा पूर्णाकृती पूतळ्याचे अनावरण सोहळा व आदिवासी समाज प्रबोधन मेळावा तथा ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

           याप्रसंगी कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, आ. वि.स. सरसेनापती नंदू नरोटे, नियोजन समिति सदस्य नाना नाकाडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, प्रदेश प्रतिनिधि यूनूस शेख, माजी प स उपसभापति बि के लोणारे, राका जिल्हा उपाध्यक्ष अयूब खान तालूका अध्यक्ष राम लांजेवार, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, माजी जि प सदस्य अनिल केरामी, कीशोर तलमले, रियाज़ शेख आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यानी सांगीतले की ग्रामसभेचा सक्षमीकरणाकरीता तेंदू व बांबूच्या रायल्टी करीता गाव हद्दीची सीमांकन होणे गरजेचे असल्याचे सांगीतले तर कूरखेडा कोरची व धानोरा तालूक्यात माडीया समाज मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याना गोंड जातीचे प्रमाणपत्र असल्याने ते प्रिमिटिव्ह ट्राईब च्या योजने पासून वंचित राहावे लागत आहे.         शासनाने सदर अडचण लक्षात घेत आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी मार्गदर्शनातून नंदू नरोटे यानी केली.

             कार्यक्रमाचे संचालन प्रविण दूगा प्रस्ताविक उपसरपंच मोहन पूराम तर आभार प्रदर्शन माजी जि प सदस्य नाजूक पूराम यानी केले तर कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता रामसाय पूराम, वासूदेव दूगा,शालीक पूराम, सरपंच ललीना पूराम,माजी प स सदस्य इंदिरा पूराम व गावकर्यांनी सहकार्य केले.