कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-पो.स्टे . पारशिवनी अंतर्गत १६ किमी अंतरावर मौजा डुमरी कला शेती फार्म येथे दिनांक २ ९ / ०१ / २०२३ चे १२.०० वा . ते ३०/०१ / २०२३ चे सकाळी ०८.३० वा . दरम्यान डुमरीकला शेतीफार्म येथुन स्थळीतुन येथील क्रॉक्रेट मिक्सर मशीन ( देशी जुगाड ) किंमती अंदाजे ४०००० / – रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे . पारशिवनी येथे आरोपीविरुध्द कलम ३७ ९ भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक याचे मार्गदर्शनार्थ पोलिस हवालदार रवि बर्वे हे पुढील तपास करीत आहे .