
रोहन आदेवार
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
वर्धा: महाराष्ट्राचे दुसरे, मुख्यमंत्री लोकनेते स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष या निमित्याने जयंती समारोह समितीने दि. ४ ते १० जानेवारी २०२५ या काळात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अंगभूत बौद्धिक कौशल्याला वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
जयंती समारोहानिमित्त आयोजित सप्ताहात
पहिले पुष्य :- दि. ४ जानेवारी २०२५ ला खुली निबंध स्पर्धा गट-अ, वर्ग ५ ते ८, गट-ब वर्ग ९ ते १२ व गट क पदवीधर ते खुल्या वर्गासाठी आयोजित केलेली आहे. निबंध स्पर्धेचा विषय कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व सामाजिक कार्य हा आहे.
दुसरे पुष्प :- दि. ५ जानेवारी २०२५ ला लोकविद्यालय, वर्धा येथे चित्रकला स्पर्धा, गट अ वर्ग ५ ते ८ व गट-ब वर्ग ९ ते १२ साठ आयोजित केलेली आहे. चित्रकलेचे विषय १. भटक्या व विमुक्त जमातीची जीवनपद्धती २. भारतीय संस्कृती (सण व उत्सव) ३. वृक्ष संवर्धन काळाची गरज असे आहे.
तिसरे पुष्प :- दि. ६ जानेवारी २०२५ रोजी कर्मवीर मा. सां. कन्नमवार यांच्या प्रतिमेचे समाजबांधवांमध्ये व शाळेमध्ये जाऊन वितर करण्यात येईल.
चौथे पुष्प :- दि. ७ जानेवारी २०२५ ला अनिकेत समाजकार्य महाविद्यालय, सावंगी (मेघे), वर्धा येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. वक्तृत्व स्पर्धेचा विषय भटक्या व विमुक्त जमातीची दशा व दिशा (समस्या, आव्हाणे व उपाय) असा आहे.
पाचवे पुष्प :- दि. ८ जानेवारी २०२५ रोजी श्री गजानन महाराज निवासी पौढ मतीमंद मुलामुलींची कर्मशाळा, कारला रोड, वर्धा. येथे श्री. संजय इंगळे तिगांवकर (विशेष कार्यकारी अधिकारी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था, सावंगी (मेघे) वर्धा) यांचे सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले आहे.
सहावे पुष्प :- दि. ९ जानेवारी २०२५ त्रिमुर्ती उद्यान, त्रिमुर्ती नगर, उमरी (मेघे), वर्धा येथे श्री. सचिनभाऊ खोसे उपसरपंच उमरी (मेघे), वर्धा) यांचे सहकार्याने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
सातवे पुष्प :- दि. १० जानेवारी २०२५ रोजी सर्कस ग्राऊंड, रामनगर, वर्धा येथे अभिवादन व प्रेरणा बाईक रॅली आयोजीत करून वर्धा शहरातील मान्यवरांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून यमुना हॉल (लॉन), गोपुरी चौक, नालवाडी, वर्धा येथे कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंती अभिवादन समारोहास सुरूवात होईल.
या अभिवादन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून सन्माननीय ना. डॉ. पंकजजी भोयर (राज्यमंत्री, गृह, सहकार, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, खनीकर्म महाराष्ट्र राज्य), अध्यक्ष म्हणून डॉ. अमोल सिंगम (संचालक अर्णम हॉस्पिटल, वर्धा), उद्घाटक म्हणून श्री. आशिष गोस्वामी (सचिव, पिपल फॉर अॅनिमल, वर्धा), माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांचे राजकिय व सामाजिक विचार आणि वर्तमान राजकिय परिस्थिती या विषयावर बीज भाषण करण्यासाठी डॉ. अशोकजी चोपडे (माजी प्रदेश अध्यक्ष, सत्यशोधक समाज तथा माजी कार्यकारी संपादक मराठामार्ग मासिक), प्रमुख अतिथी, श्री. अशोक आकुलवार (माजी इंग्रजी भाषा तज्ज्ञ मार्गदर्शक, एस.सी.इ.आर.टी., पुणे, यशदा, पुणे, ब्रिटीश कॉन्सील, मुंबई तथा माजी पत्रकार लोकमत), श्री. शुभम गुंडतवार (कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, जि. प. वर्धा), श्री. प्रविण धोपटे (अध्यक्ष वर्धा श्रमिक पत्रकार वर्धा), सौ. अरूणाताई कोटेवार (ज्येष्ठ समाजसेविका तथा प्रांतीय सदस्य विर्भ समाज तत्सम जमाती संघटना मुख्य शाखा, चंद्रपूर), सौ. सोनालीताई कोपुलवार (वर्धा जिल्हा अध्यक्ष विमुक्त जाती व भटक्या जमाती (वि.जे.एन.टी.सेल) वर्धा जिल्हा कॉग्रेस कमेटी) यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.
वरील सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविण्याची विनंती निमंत्रक प्रा. रूपेश कुचेवार व समन्वयक प्रा. अमित चिनेवार तसेच लोकनेते स्वातंत्र्य सेनानी कर्मवीर मा. सां. उपाख्य दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती समारोह समिती, वर्धाच्या सर्व सभासदांच्या वतीने करण्यात येत आहे.