केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन… — ९ जानेवारी २०२५ ला स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजन… 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

भद्रावती, दि.०४ :-

             चंद्रपूर जिल्हा केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा द्वितीय स्नेह मिलन सोहळा दि.९ जानेवारी २०२५ रोज गुरुवारला स्वागत सेलिब्रेशन मेन रोड भद्रावती येथे सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजीत करण्यात आला आहे.

         ज्या कर्मचाऱ्यांचे वयाचे ७५ वर्ष ०१ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत पूर्ण केले असेल किंवा लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाले असेल अशा सेवानिवृत्त कर्मच्याऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सी.जी.एच.एस. संबंधित माहिती, पेन्शन संबंधी माहिती, आरोग्य विषयी माहिती विविध तज्ञ मान्यवरांकडून देण्यात येणार आहे.  

          आपल्या सहकाऱ्यांसोबत जे सुख दुःखाचे क्षण घालविले आहे, त्यांना भेटून जुन्या आठवणीला उजाडा देता यावे तसेच मित्रांना पुन्हा भेटण्याकरिता केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी, जिल्हा चंद्रपुर यांचे कडून केली आहे.