रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते आज दिनांक 4 डिसेंबरला चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोलारा निसर्ग पर्यटन प्रवेशद्वार संकुल फेज (1) चे लोकार्पण तसेच संरक्षक कुटी साठी आवश्यक साहीत्य वाटप सोहळा थाटात पार पडला.
यावेळी मंचावर प्रामुख्याने वनविभागाचे सीसीएफ डॉ. जितेंद्र रामगावकर सर, भारताचे सर्वश्रेष्ठ हृदय शल्य चिकित्सक तथा समाजसेवक डॉ. रमाकांत पांडा सर (मुंबई), डीएफओ (कोअर) श्री. आनंद रेड्डी सर, डीएफओ (बफर) सौ. पियुषा जगताप मॅडम, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश वाकडे, सरपंच्या ग्रा. पं. कोलारा सौ. शोभाताई कोयचाडे, उपसरपंच ग्रा. पं. कोलारा सचिन डाहूले व अन्य मान्यवर उपस्थित होते.