थिलोरी येथे नागरिक हक्क संरक्षण समितीची शाखा स्थापन…

युवराज डोंगरे /खल्लार

           उपसंपादक

          क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती दिनी थिलोरी येथे नागरिक हक्क संरक्षण समितीची शाखा स्थापना करण्यात आली.

            सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागरिक हक्क संरक्षण समितीचे सचिव शरद रोहनकर यांनी तर सवित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कु. समता इंगळे या छोट्या मुलीने भाषण दिले तसेच अध्यक्षिय भाषण नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड संतोष कोल्हे यांनी केले.

           यावेळी कार्यक्रमाला उपस्थित ऍड संतोष कोल्हे तसेच शरद रोहनकर, पंकज अनासाने, सुधिर तायडे,ऍड नागेश रायबोले सौ अंबिकाताई कोल्हे, रामदास वाकपांजर, देवराव वाकपांजर पूर्णाजी वाकपांजर सुखदेव धंदर, शुभम बावनेर, संदेश वाकपांजर, गजानन होले, यांच्यासह समितीचे पदाधिकारी गावकरी मंडळी उपस्थित होते.तसेच समितीच्या वतीने नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

          नागरिक हक्क संरक्षण समिती थिलोरीच्या अध्यक्षपदी प्रा.अनिरुद्ध होले सचिव पदी इंजी. अनिकेत वाकपांजर, कोषाध्यक्ष पदी सुभाष बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली. आभार प्रदर्शन इंजी अनिकेत वाकापांजर यांनी केले.