
उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
स्त्री शिकली,”धर्म बाटला,पासून मुलगी शिकली,प्रगत झाली,असं व्यवस्थेला म्हणायला भाग पाडणारी,स्त्री शिक्षणासाठी स्वतः पिडणारी,आजच्या शिकून शाहण्या झालेल्या सर्व महिलांना मार्गदर्शक असणारी,क्रांतीची ज्योत सदैव तेवत ठेवणाऱ्या ज्ञानज्योती तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
सायंकाळी खुटाळा येथील महिला भजन मंडळा द्वारे मौजा कोटगाव येथील महिलांना आणि नागरिकांना गितगायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले.
यानंतर सकाळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ मोठ्या उत्साहात गावातून रॅली काढण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्या,बौध्द समाज बांधव,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,साहाय्यक शिक्षक,विद्यार्थी,अंगणवाडी सेविका,मदतनीस व बालक सहभागी झाले होते.
यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित प्रकाश टाकण्याकरीता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मार्गदर्शन कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून केंद्रीय उत्पादन शुल्क नागपूर कार्यालयातील सुपर क्लाॅसवन अधिकारी मिलिंद रामटेके,चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वप्निल मालके,माजी पंचायत समिती सदस्या सौ.भावनाताई बावनकर,माजी प.स.सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेस किसान सेलचे चिमूर तालुका अध्यक्ष राजू कापसे,माजी प.स.सदस्या तथा भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मायाताई नन्नावरे,ग्रामपंचायत सरपंच सौ.मुक्ताताई गिरीधर कापसे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अँड.जयदेव मुन,सामाजिक कार्यकर्ते रमेश चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन पटलावर सविस्तर प्रकाश टाकलाय आणि उपस्थितांचे उद्बोधन केले.तद्वच आजच्या स्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व देश उभारणीसाठी आणि महिलांच्या शिक्षणासाठी,मानसन्मानासाठी,उध्दारासाठी कसे महत्वाचे आहे यावर मार्गदर्शनात भर देण्यात आला.
मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.सुनीता रामटेके,सचिव गुलजनबाई खोब्रागडे,सदस्या सौ.विनाताई रामटेके,सौ.निरंजनाताई रामटेके,सौ.पोर्णिमा रामटेके,सौ.दर्शना रामटेके,सौ.गैनाबाई रामटेके,सौ.कुमूद रामटेके,सौ.कुसूम रामटेके,सौ.येशोधराबाई पाटील,सौ.महानंदाताई रामटेके,सौ.प्राणशिला खोब्रागडे,सौ.प्रेमीला जांभुळे,श्रिमती दुर्गाताई वाघमारे,सौ.संघमित्रा खोब्रागडे,सौ.वनीता राऊत,सौ.कांताबाई वासनिक,सौ.सवीताताई शेंडे,श्रिमती वनमाला शेंडे,सौ.रिना रामटेके,सौ.छाया खोब्रागडे,सौ.अल्का शेंडे,आणि इतर सर्व महिला भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व महिला सुध्दा सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे नेहमी समाज प्रबोधनाचे कार्य करतात हे विशेष.