गवराळा येथील जगन्नाथ मंदिरात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

         भद्रावती येथे जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा यांचे तर्फे गवराळा येथील जगन्नाथ महाराज मंदिरात दिनांक तीन रोज शुक्रवारला स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          यावेळी जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळाचे श्यामराव खापणे, नीलकंठ आत्राम, उद्धवराव निळे, अरुण येरकाडे, बंडू परचाके, राजू माडेकर, लिमेश माणूसमारे, दिनकर घाटे,संजय बदखल, महादेव डोंगे, प्रभाकर निमकर, प्रभाकर कुटेमाटे, मंगेश येरमे, शामराव धक्षिणे आदी मान्यवर उपस्थित होते.

          प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाविषयी केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला व विशेषता स्त्रियांनी शिक्षणात नेहमी अग्रेसर राहावे असे आवाहन केले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिमेश माणूसमारे यांनी, संचालन अरुण येरकाडे यांनी, तर आभार बंडू परचाके यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.