डॉ. जगदिश वेन्नम

   संपादक

 भामरागड:नक्षलीदृष्टया अतिसंवेदशील असलेला गडचिरोली जिल्हा , दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखिल विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व नक्षल कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलिस दलाने आज दिनांक 4/1/2023 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मन्ने राजाराम या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.

 

 

सदर पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, त्यात 1000 मनुष्यबळ , 10 जेसीबी,10 ट्रेलर,3 पोकलेन,40 ट्रक इत्यादीच्या सहायाने अवघ्या एका दिवसात पोस्ट उभारणी करण्यात आली.पोस्टमध्ये वायफाय सुविधा ,20 पोर्टा कॅबिन, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात आली पोस्ट सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 46 अमलदार, एसआरपीफ चे 2 अधिकारी व 50 अमलदार तसेच सीआरपीएफ चे एकअसिस्टंट कमांडंट,4 अधिकारी व 60 अमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोस्ट उभारणी कार्यक्रमात जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला त्यात मंने राजाराम येथील नागरिकांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

 

सदर पोस्ट उभारणी कार्यक्रमात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री. संदीप पाटील सो., सीआरपीएफ चे पोलिस उपमहानिरीक्षक श्री. लोकेंद्र सिंह सो.,पोलिस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सो., सीआरपीएफ 9th बटालियन चे कमांडंट श्री. बाळापूरकर सो., अपर पोलिस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सो., अपर पोलिस अधीक्षक(अहेरी )श्री. यतीश देशमुख सो., अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सो., उपविभागीय पोलिस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापुरे व मन्ने राजाराम चे नवनियुक्त प्रभारी श्री. उमेश कदम उपस्थीत होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News