पारशिवनी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून महिलांना शिक्षणाचे दालने खुली करून दिली म्हणूनच या समाजत स्त्री सन्मानाने जीवन जगत आहे त्यांचे हे आदर्श कार्य भारतीय • स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे असे नगर पंचायत सदस्या पाणी पुरवठा सभापती सौ . अनिता प्रमोद भड यांनी केले . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलुताई भुजाड़े, रिकी रंगारी आदीसह महीला मंडळ च्या महीला ची उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सौ . अनिता प्रमोदभड ( सभापती पाणी पुरवठा नगर पंचायत पारशिवनी)यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सौ . अनिता प्रमोद भड म्हणाल्या की , ज्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते त्यांना शिक्षणाचे अधिकार , सामाजिक अधिकार नव्हते समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते त्या काळात सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर दगड माती , शेण झेलून स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडून त्या स्वतः पहिल्या महिला शिक्षिका झाल्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करून स्त्रियांना शिक्षणाचे दालने खुली करून दिले त्यामुळे समाजात स्त्रियांना मानाचे स्थान मिळाले आहे पुरुषाचे बरोबरीने स्त्रिया प्रतेक क्षेत्रात काम करत आहेत स्त्रियाना त्यांचे सर्व हक्क मिळाले हे सर्व सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यामुळे घडले , त्यांचा कार्याचा व विचाराचा वारसा भविष्यामध्ये मुलींनी चालवावा म्हणूनच सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांची योगदान भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे . याप्रसंगी सौ . निल ताई भुजाड़े आणी रिकी रंगारी यांनी असे आवाहन केले की महीलानी पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांची प्रगती घडून आणावी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा डटमल यांनी तर आभार प्रदर्शन कविता वाडके यांनी केले .