नाही तर आळंदी येथील साखळी उपोषण स्थगित केले जाईल… — मराठा बांधवांनी बेकायदेशीर कठोर पाऊल उचलू नये म्हणून सामुहिक शपथ…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणसाठी प्राणाची बाजी लावून उपोषण आंदोलन करत आहेत. राज्यातून सकल मराठा समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. राज्य सरकार मात्र गांभीर्याने लक्ष देत नाही. म्हणून आळंदी येथील एक मराठा तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले त्यामुळे आळंदीतील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला यामुळे गालबोट लागले आहे. 

         आळंदी शहरातील ज्येष्ठ नेते डि.डि.भोसले पाटील व निसार सय्यद यांनी त्याची समजूत काढून त्याला खाली उतरवले. सदर प्रकरणाची दखल घेऊन आळंदी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने येथून पुढे असे कोणीही मराठा बांधव कठोर पाऊल उचलले जाणार नाही, असे पाऊल उचलले गेले तर साखळी उपोषण स्थगित केले जाईल असे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले. तसेच माजी सभापती डि.डि.भोसले पाटील यांनी कोणाकडूनही असे पाऊल उचलले जाणार नाही अशी सामुहिक शपथ घेतली. आज उपोषणस्थळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी भेट दिली. यावेळी महाद्वार चौकात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. 

         सायंकाळी सहा वाजता उपोषण स्थळी सामुहिक हरीपाठ झाला नंतर सामुहिक शपथ घेतली गेली. यावेळी डि.डि.भोसले पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, आनंदराव मुंगसे, प्रकाश कुऱ्हाडे, अर्जून मेदनकर, शशीराजे जाधव, सचिन गिलबिले, दिनेश घुले, निसार सय्यद, दत्ता पगडे, महेश आंबूरे , स्वप्निल जगताप, भागवत शेजूळ, श्रीकांत काकडे, मोहन महाराज शिंदे, दादासाहेब कारंडे, प्रसाद बोराटे, अरुण कुरे तसेच अनेक मराठा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.