वादग्रस्त जिप्सीचा ठराव ग्रामसभेत नामंजूर…  — ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालणार नाही हे गावकऱ्यांनी दाखवून दिले.. — कडेकोट पोलीस बंदोबस्त..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

           अवैध जिप्सीचा ठराव अखेर ग्राम सभेने नामंजूर करुन ग्रामपंचायत पदाधिकारी मनमानी कारभार करु शकत नाही हे चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे.

             अवैध जिप्सीचा वादग्रस्त ठराव नाममंजुर करण्यासाठी ग्रामस्तांनी तत्पूर्वी ग्रामपंचायतीला कुलुप लावले होते.यामुळे कोलारा येथील वातावरण खूप तापले होते.

          गावात अनुचित घटना घडू नये म्हणून चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.दंगा नियंत्रक पथक सुध्दा पाचारण करण्यात आले होते.

          तीसऱ्या दिवसी तोडगा न निघल्यांने पोलीस संरक्षणात कुलुप तोडले व ग्रामसेवकांनी २७ ऑक्टोबर रोज शुक्रवारला विशेष ग्रामसभा ग्राम पंचायत आवारात घेतली होती.त्या ग्रामसभेत अखेर तो वादग्रस्त ठराव गावातील नागरिकांकडून नाममंजूर करण्यात आला.

           कोलारा ग्रामपंचायतीत गावकर्यांनी ग्राम सभेचे आयोजन १४ ऑक्टोबरला केले होते,या ग्रामसभेत सरपंच सदस्य आले नव्हते.त्यामुळे गावकऱ्यांनी रात्रो १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोलाराला कुलुप लावले होते.

           दरम्यान ग्रामसेवकांनी तीन दिवसांनी पोलीस संरक्षणात कुलुप तोडले व ग्रामसेवकाने ग्रामसभेची नोटीस काढून शुक्रवारला त्या जिप्सीच्या वादग्रस्त ठरावा विषयी ग्रामसभेचे आयोजन केले.

             ग्रामसभेला गावातील महिला,पुरुष उपस्थित होते.ग्रामभेला दोन विषय ठेवण्यात आले होते.कोलारा येथील डिजीटल गेट बाजुला नेण्यात यावा.मात्र वन विभागाने त्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना गेटच्या बाजुला रस्ता काढून देण्याचे आवश्वान दिले.त्यामुळे तो विषय एकमतांनी मंजुर करण्यात आला.

           परंतु चार जिप्सी गेटवर लावण्याचा वादग्रस्त विषय घेताच गावकऱ्यांत संतापून ग्रामस्तांच्या एकमतांनी तो वादग्रस्त ठराव नामंजूर करण्यात आला.या गेटवर जिप्सी घेतांना विशेष ग्रामसभेचे आयोजन करूनच व ईश्वरचिठ्ठीनेच पुर्वीच्या पद्धतीनेच निवड करण्यात यावा,असाही ठराव मंजुर करण्यात आला.ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

          ग्रामसभेच्या दिवशी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते व गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात पोलीसांचे दंगा पथक,पोलीसांची कुमक गावात तैनात करण्यात आली होती.