धानोरा / भाविक करमनकर
धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्री बाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी टी कोहाळे होते प्रमुख अतिथी म्हणून डॉ.रश्मी डोके मॅडम , रजनी मडावी, रेखा कोरेवार,स्नेहा हेमके, संगिता निनावे, सौ . चीलमिलवार मॅडम,किरण दरडे, प्रशांत साळवे, प्रशांत तोटावार , मोहन देवकते, अशोक कोल्हटकर , विजय बूरमवार,शंकर रत्नागिरी,ओम देशमुख,प्रमोद शहारे, हारीश पठाण, बादल वर्गंटीवार उपस्थित होते, यावेळी मान्यवरांनी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत, भाषण व नृते केली. सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले तसेच प्राचार्य डी टी कोहाळे यांनी सावित्री बाई फुले यांनी वाईट समाजाची पर्वा न करता मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सतत सुरू ठेवले आहे व समाजात वाईट चालीरीती यांच्या विरोधात पुढाकार घेतले आणि आज सावित्री बाई मुळे सर्व महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले असे प्रतिपादन केले ह्या कार्यक्रमाचे संचालन वर्ग १२वि ची विद्यार्थिनी कु.यामिनी सोनुले व आभार कु.पल्लवी मडावी यांनी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेटी, कोटगले,शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.