सकल नाभिक समाज म.ना.म.भंडारा गोंदिया जिल्हा पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा साकोलीत संपन्न…

      ऋग्वेद येवले..

नागपूर विभागीय प्रतिनिधी

            साकोली:महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पूर्व विदर्भ द्वारा आयोजित भंडारा व गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची तथा सर्व तालुकाध्यक्ष,तालुका पदाधिकारी यांची संयुक्त बैठक व पूर्व विदर्भ विभागीय सभा “रामभक्त हनुमान मंदिर” तलाव वार्ड साकोली येथे थाटात संपन्न झाली.

             सदर सभेचे आयोजन म.ना.म.चे विदर्भ (पूर्व) विभागाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या आदेशानुसार भंडारा जिल्हा शाखेद्वारे तथा गोंदिया जिल्ह्याच्या सहयोगातून करण्यात आले होते. 

                 सभेला पूर्व विदर्भ विभागाचे पदाधिकारी तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सभेची सुरुवात संतश्रेष्ठ सेनाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. 

                 तद्नंतर सभेचे प्रास्ताविक म.ना.म.भंडाऱ्याचे जिल्हा अध्यक्ष जगदीश सुर्यवंशी यांनी केले.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष श्याम आस्करकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र इंगळे,शरदराव उरकुडे,नामदेवराव शेंडे,कृपाल लांजेवार,प्रा.अशोकराव सालोटकर,मधुकर फुलबांधे, नामदेवराव इंझनकर,सुरेशराव अतकरे,मोहनराव निंबाळकर,संजय चन्ने,हे पूर्व विभागीय पदाधिकारी तथा नागपूर जिल्हा कार्य.सचिव विजय वालूकर,जेष्ठ समाजसेवक तुकाराम चावके व आरमोरी तालुका अध्यक्ष कालिदास लक्षणे उपस्थित होते.

              सदर सभेत पूर्व विदर्भाच्या मागील सभेत राहिलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.कार्यशाळेत प्रामुख्याने संघटन, प्रबोधन व परिवर्तन या बाबींवर प्रकाश टाकण्यात आले तसेच संत सेनाजी महाराज केशशिल्पी मंडळ,संदर्भिय फक्त राजकीय घोषणा यांवर विशेष मंथन करण्यात आले. 

                गोंदिया जिल्हा महिला अध्यक्षा सौ.लक्ष्मीताई लांजेवार यांनी संघटना व समाजातील शाखाभेद यावर सुंदर अशा शब्दांत संबोधित केले.

                 तसेच भंडाऱ्याच्या महिला जिल्हाध्यक्षापदी श्रीमती मायाताई लांजेवार यांची नियुक्ती करण्यात आली.

              मान्यवरांनी सभेला संबोधित करताना जिल्हा स्तरापासून तालुका,सर्कल पर्यंत संघटन मजबूत करताना,संघटनेतर्फे येणाऱ्या काळात अनेक समाजापयोगी उपक्रम हाती घेण्यावर भर देण्यात आले.

                त्यानंतर आभार प्रदर्शन म.ना.म. गोंदियाचे जिल्हाध्यक्ष श्री. बेनिराम फुलबांधे यांनी केले तर सुंदर सुत्रसंचालन रमेश उरकुडे यांनी आपल्या हातात घेतले,लगेच फराळ व चहापान करून सभेचे समापन करण्यात आले.

               कार्यक्रमाच्या सफलतेसाठी दोन्ही जिल्ह्याच्या सर्वश्री श्रीयुद प्रमोद मेश्राम सर,अशोक फुलबांधे,राजकुमार लांजेवार,रवी लांजेवार,राजू सुर्यवंशी,आदिनाथ सुर्यवंशी,मिताराम पोवनकर,जगदीश पोवनकर,हेमराज उरकुडे सर,सचिन सुर्यवंशी,दिगांबर सुर्यवंशी,देवेंद्र सुर्यवंशी,गुलशन फुलबांधे,किशोर लांजेवार,मोहन फुलबांधे,वैभव सुर्यवंशी,संजय फुलबांधे भंडारा तसेच प्रकाश सुर्यवंशी,प्रकाश शिवणकर,संतोष लांजेवार,विजय उमरकर,शालिकराम उरकुडे,गोंदिया यांनी सहकार्य केले.