ऋषी सहारे

संपादक

 

आरमोरी… स्थानिक आरमोरी येथील जेतवन बोद्ध विहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम मॅडम होत्या.प्रमुख अतिथी स्थानी महिला लोक आयोगाच्या मंजुषाताई दोनाडकर होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क़ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आशा बोरकर, रेखा खोब्रागडे, कूंदा खोब्रागडे ह्या होत्या. क़ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर अनेक महिलांनी आपल्या भाषण, ओव्या व कविता म्हणून कार्यक़माची शोभा वाढविली. तसेच अनेक प्रोत्साहन स्पर्धा घेऊन तथा महिलांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली रोडगे, संचालन विद्या चौधरी व आभार प्रदर्शन वंदना शेंडे यांनी केले.कार्यक़माच्या यशस्वीतेसाठी भारती मेश्राम, रेखा बांबोळे, रंजना वाकडे, सपना खोब़ागडे, शितल खोब्रागडे, श्रुती गेडाम, सविता जूवारे, खूशबू लोणारे, मीना बांबोळे, शिल्पा खोब्रागडे, भाग्यश्री वाकडे, वनमाला सूखदेवे, शोभा बारसागडे, शारदा उंदिरवाडे, नैना रामटेके, भाग्यश्री खोब्रागडे, पोर्णिमा वाकडे, श्रेया उंदिरवाडे, अनू रामटेके, माया बोरकर, सारिका बोरकर, मिना बांबोळे, निर्मला रामटेके, ज्योती शेडमाके, पूष्पा लोणारे, चंदा मूलमूले, नलू गोवर्धन, शालू वाकडे, माधूरी बांबोळकर, बनाबाई सूखदेवे, भावना बारसागडे, बेबिनंदा खोब्रागडे, नयना रामटेके, लोपमूद़ा ठवरे अशा अनेक महिला उपस्थित होत्या.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News