अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्याने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष मदन जी मेश्राम हे होते. तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नरेंद्रकुमार कोकडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी हे होते.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, सेवानिवृत्त प्राचार्य पि.के. सहारे सर, सेवानिवृत्त प्राचार्य पि.के. दुधे सर, पालक शिक्षक संघ डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी चे उपाध्यक्ष एकनाथ अंबाडे, पालक शिक्षक संघ डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी सहसचिव प्रदीप जी खोब्रागडे, या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून आंबेडकर विद्यालयाचे प्राचार्य शेंडे सर, पर्यवेक्षक आर. एम . नैताम सर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन करताना प्रदीप खोब्रागडे यांनी आपले अनुभव विशद करत असताना शाळांमधून नेमके काय होते. जसे आपण म्हणतो, डॉ. आंबेडकर विद्यालय ,शिवाजी विद्यालय, महात्मा फुले विद्यालय ,सावरकर विद्यालय, विवेकानंद विद्यालय ,महात्मा गांधी विद्यालय, आपण म्हणतो काय फरक आहे.
या शाळांमध्ये माझा एक दोन पालकांसोबत आलेला अनुभव एका मित्राने माझ्यापुढे मांडलेले अनुभव मी आपल्यापुढे मांडावे असे मला वाटते.शाळेचा जसा नाव असतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावर पालकांची भूमिका काय असते. पालकांचा काय उद्देश असते. जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत आपण आपल्या मुलाला टाकावे किंवा टाकू नये. पालकाचा काय उद्देश असते की आपली मानसिकता कशी आहे. की आम्हाला तत्व पटत नाही. तर कशाचे तत्व पटत नाही. की शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय हे नाव आहे म्हणून काही लोकांना तत्व नाही पटत तर काहींना पटते तर इथे काय शिकवले जाते नेमके बाबासाहेब आंबेडकर शिकवले जाते काय तर तेही अजिबात नाही. महात्मा गांधी शाळेत महात्मा गांधी शिकवले जाते काय तर तेही अजिबात नाही. शिवाजी शाळेत शिवाजी शिकवले जातात काय तेही अजिबात नाही. महात्मा फुले शाळेत महात्मा फुले शिकवले जातात काय तेही अजिबात नाही. मग पालकांमध्ये असे संभ्रम का? आणि विद्यार्थ्यांमध्ये हे संभ्रम का? आणि मग हे विचार मांडण्यासाठी नेमके काय करावे लागतील. महात्मा गांधी विद्यालय असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय असो मग विद्यार्थ्यांना यांचे प्रेरणादायी विचार कुठून मिळणार हा प्रश्न नाही का ? मग एखाद्या पालकांची इच्छा जर असेल की माझ्या मुलाला बाबासाहेबांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातून मिळत असतील आणि माझ्या मुलाच्या भविष्यात ते उपयोगात पडू शकतील असे जर एखाद्या पालकाला वाटत असेल पण ते विचार जर अजिबात शाळांमधून मिळत नसतील तर त्या पालकाची किंवा पाल्याची अपेक्षाभंग होणार नाही का? मग नेमके काय होत आहे. संस्थापक काय करत आहेत की औरंगजेब खलिफा मध्ये म्हणतात, औरंगजेब आपल्या खलिफांमध्ये लिहितात, औरंगजेब काय म्हणतो जुन्या काळातला माझ्या एक गुरुजी माझ्याकडे मदत मागायला आला गुरुजी म्हणतो की औरंगजेब मी तुला शिकवलं आहे. तू लहान असताना मी तुला शिक्षण दिले आहे. आणि आता मी अडचणीत आहे.
तर मी तुझा गुरुजी म्हणून मला तुझ्याकडून मदतीची अपेक्षा आहे की मी वृद्धापकाळत आहे. मला तुझ्याकडून पैशाची मदत हवी आहे. तेव्हा तो औरंगजेब आपल्या गुरुजीला म्हणतो की तुम्ही त्या काळात मला शिकवले आहे .परंतु तुम्ही मला काय शिकवले की त्यावेळेस धार्मिक मुद्दे किंवा इस्लामांच्या बाबतीत जे जे होते ते मला शिकवले. त्यांच्यापलीकडे मी राजा होऊन मला जे समाजचालकांवरती बनण्यासाठी काही तुमच्याकडून पाहिजे होते ते मला मिळाले नाही.
कारण ते तुमच्याकडेच नाही .आणि त्यामुळे मी तुम्हाला आज मदत करत नाही. कारण जे काही धार्मिक शिक्षण त्या काळात तुम्ही मला दिलेला असेल त्याचा मोबदला तुम्ही घेतलेला होता. आणि म्हणून मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे मदत करणार नाही .
एकीकडे पहा की औरंगजेब आपल्या गुरूचं गुरुत्व नाकारत आहे औरंगजेबाच्या गुरूंनी दिलेले शिक्षण फारसा त्यांच्या कामात नाही पडत आहे .परंतु दुसरीकडे जर विचार केला तर बाबासाहेबांकडे पाहिलं तर असं वाटते की बाबासाहेब आंबेडकर न पाहता महात्मा ज्योतिबा फुले यांना फुले यांना आपले गुरु मानतात म्हणून माझं मत असं आहे की, तुम्ही जे शिक्षण विद्यार्थ्यांना देता ते शिक्षण विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात आणि विद्यार्थ्यांच्या जाणीव समृद्ध त्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी ते जर कामाचं नसेल तर तुमच्या गुरुत्व पणाला काहीही अर्थ नाही .
वारंवार वारंवार जेव्हा शैक्षणिक विषयी निघतो तेव्हा असं म्हटल्या जाते की आजचा विद्यार्थी संस्कार विसरलेला आहे. त्याला मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे .मूल्य शिक्षणाचा जेव्हा जेव्हा विषयी निघतो तेव्हा तेव्हा मात्र संविधानिक मूल्यांवरती अजिबात विचार केला जात नाही. कोणीही त्या दृष्टिकोनात पाहत नाही कारण संविधानिक साक्षरता आपल्याकडे नाही .मग संविधानिक मूल्य ऋदविण्यासाठी काय आहे मग संविधानाची प्रास्ताविका तर दररोज आपल्या शाळेत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून म्हटल्या जाते. मग संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नेमके काय आहे ते समजून देण्याची समजावून देण्याची व त्यांच्या वरती कृती करण्याची शिक्षक म्हणून किंवा शाळा म्हणून त्यावरती काही उपक्रम राबवते का उपक्रम जरी राबवत नसेल तरी दैनंदिन विद्यार्थ्यांच्या आश्रनामध्ये ते मुद्दे यावा असं कोणाला वाटते की सामाजिक न्यायाचा जो मुद्दा आहे बंधुत्वाचा मुद्दा आहे.
आजकाल कालच्या स्नेहसंमेलनामधून ग्यादरिंग मधून जे गट पडतात आता इथे नाहीत ती चांगली बाब आहे. परंतु असं होते की कॉलेजमधून ज्या निवडणुका होतात त्यामधून लोकशाहीची ओळख व्हायला पाहिजे. पण कॉलेजमधून निवडणुका घेत असताना नेमके काय होते की आमच्यासारखे राजकारणी आहेत ते त्यामध्ये हस्तक्षेप घालतात आणि काय करतात मग जे संविधानिक मूल्य काय आहे संविधानिक मूल्य भारताच्या संविधानाचे प्रास्ताविका जरी आम्हाला समजली नसेल तर भारताचे संविधान आम्हाला समजेल का? कारण जिथे सामाजिक न्यायाचा प्रश्न निर्माण होतो. व आम्हाला भारताचे संविधान माहीत नाही. आमच्या लोकप्रतिनिधींना माहित नाही .आली वेळ तर कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याची स्पेलिंग सुद्धा येत नाही. मग असे प्रतिनिधी असतात तर भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेवर ती किंवा भारताच्या संविधानावर विचार करणारा आमचा शिक्षक नसेल आमचा विद्यार्थी नसेल व संविधानिक मूल्य जर निर्माण झाले नाहीत तर या देशाचा जो आपण सुजान व समृद्ध नागरिक निर्माण झाला पाहिजे म्हणतो तो कसा होईल .
इथे असे कोणते मूल्य आहेत की भारताचा नागरिक सुजाण व समृद्ध निर्माण होईल कोणत्या धर्माच्या ग्रंथात अशी मूल्य आहेत ते आज आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कारण धर्मांनी काय केले आहे माणसा माणसांमध्ये भेद करणे शिकवलेले आहे आणि संविधान काय करते तर माणसांना एकत्र गुंफण्याची प्रेरणा देते सावित्रीबाईंचा दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
तो असा की शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवल्या जाते परंतु तिथे प्रथा परंपरा पारंपारिक पडल्या जात आहेत. ज्यांच्यापासून आपल्याला शिक्षणाच्या संदर्भात प्रेरणा घ्यायला पाहिजे तसं न होता त्याच्या उलट होताना दिसतो आहे. ज्यांच्यापासून आपल्याला शिक्षणाची प्रेरणा मिळते अशा प्रतिमा किंवा मुर्त्या सोडून कुठल्यातरी काल्पनिक प्रतिमांना मुर्त्यांना स्थान दिला जातो तेही कुठेतरी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विपरीत आश्रण आहे म्हणून सावित्रीबाई म्हणतात शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व जाते एकीकडे मुलींच्या शिक्षणाकडे भर दिल्याचा भास केल्या जाते एकीकडे बेटी पढाव बेटी बचाव घोषणाबाजी मध्ये करत असतो परंतु प्रत्यक्ष आज शिक्षणाच्या संदर्भात शाळेपर्यंत मुली येण्यासाठी आणि शाळेतून घरी जाण्यापर्यंत आज मुली सुरक्षित आहेत.
काय हे जे नैतिक मूल्य आहेत ते आपल्याला संविधानिक मूल्यातून सुद्धा विकसित करता येऊ शकतात. आमच्या देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा आपल्या बहुजनांच्या शिक्षणाची गडचिप्पी करणारा आहे. हा विषय बहुतेक अनेकांच्या गळी उतरलेला आहे .पण मात्र आश्रनात उतरत नाही याची खंत आहे. या संदर्भामध्ये शिक्षक संघटना किंवा शैक्षणिक संघटने वरती चर्चा व्हायला पाहिजे.
ती चर्चा मात्र कुठे होताना दिसत नाही. विधानसभेत जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा कुठे होताना दिसत नाही. विधानसभेत मात्र बहुतेक भौतिक सुविधांच्या बाबतीत चर्चा होते परंतु जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे यांच्यावरती विधानसभेत कधीही चर्चा न होताना सुद्धा ठराव मंजूर करून आम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मान्य आहे. असे राज यांनी कळवला आहे. आणि याचे फलित प्रत्यक्ष कृतीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात ते असे की भारताच्या जीडीपीच्या प्रमाणात शिक्षणावर ती फक्त दोन टक्के निधी एवढाच खर्च केला जातो या उलट विदेशांमध्ये हाच खर्च कमीत कमी सहा टक्के ते आठ टक्के एवढा केला जातो. आणि म्हणून आमच्या देशात शिक्षणाची व विज्ञानाची प्रगती झाली दिसते का हा विरोधाभास नाही का अशी भयावह आणि गंभीर परिस्थिती भारताची आहे. आमच्या मुलींना शाळेत येण्यासाठी साधी बस वेळेवर येऊ शकत नाही. आणि मोठ्या मुश्किलने आली तर तिथे जागा होत नाही .जनावरे कोंबल्यासारखे आमच्या बहुजनांच्या मुला मुलींना शाळेत यावे लागते.
याचा कारण असा की एसटी महामंडळाला शासन पैसे पुरवत नाही असे उत्तर मात्र महामंडळाचे असतात. आणि एखाद्या कर्जबुडव्यांचा मात्र दहा लाख करोड एवढा मोठा कर्ज या देशांमध्ये माफ केल्या जाते. महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीमध्ये भरती मध्ये 75 हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत ती भरती केली जात नाही. शिक्षकांना डिजिटल शाळेच्या नावाखाली नुसतेच गुंतवले जाते.
शिक्षणाचे बारा वाजवले जातात आणि पुन्हा आम्ही विश्वगुरू बनण्याचे दिवास्वप्न पाहतो. ही मात्र शोकांतिका आहे .आम्ही विश्वगुरू बनू शकतो काय? कारण आमच्या देशामध्ये शिक्षणावर खर्च केला जात नाही .आरोग्यावरतीच खर्च केल्या जात नाही . भारतामध्ये समतेची दूरदाने केली जाते व आमच्या मुलींवरती बलात्कारासारखे प्रसंग घडल्या जातात. आमची मुलगी सुरक्षित आहे का ? आणि आम्ही बेटी बचाव आणि बेटी पढाव ही वल्गना नुसती करतो मग आमच्या मुलींचे वाली कोण? आम्ही या देशाचे नागरिक नाही का? हा प्रश्न मात्र इथे निर्माण होतो. म्हणून माझ्या बांधवांनो सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदाने नांदावं .एकत्र यावं आणि आपल्या हक्क अधिकाराची लढाई आपण लढावी. असे मार्गदर्शनात प्रदीप जी खोब्रागडे यांनी सांगितले.