युवराज डोंगरे/ खल्लार प्रतिनिधी

खल्लार जवळील गौरखेडा(चांदई) येथील मिलिंद विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत वानखडे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे शिक्षक अमित वानखडे, अमोल बोबडे, दिपक कावरे , पुरणप्रकाश लव्हाळे , मनिषा गावंडे मॅडम, उपस्थित होते .

याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईच्या भूमिकेतून

मी सावित्री बोलतोय .

असे मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित वानखडे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन अमोल बोबडे सर यांनी पार पाडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com