छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे 3 जानेवारी 2023 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 192 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. जी. एन. अवचट सर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य जीभकाटे सर, नवखरे मॅडम, कु. आकरे मॅडम, निकुरे सर, करमरकर सर, नैताम सर, लांडगे सर, साळवे सर, वाघे सर, बोडणे सर, आर. आर. देशमुख इत्यादी हजर होते.
सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहिन्यात आली. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. नवखरे मॅडम यांनी केले त्यांनी सावित्रीबाईच्या शैक्षणिक सामाजिक कार्याचा आढावा विद्यार्थ्यांपुढे वाचून दाखवला. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झालीत. यामध्ये आफताब शेख, सागर कटलाम, कुंदन साखरे,सायली कोल्हे, प्रीती गावडे ,प्रतीक्षा मोहूर्ले, विद्या वटी, जागृती शेंडे सलोनी गावतुरे इ यांचा सहभाग होता. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जीभकाटे सरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शेवटी अध्यक्षीय भाषणातून अवचट सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे अनुकरण करावे.
कार्यक्रमाचे संचालन छन्ना खोब्रागडे सर तर आभार श्री नैताम सर यांनी मानले.