क्रांतिज्योती सावित्रीमाई
सावित्रीमाई,
तू हलविले अज्ञानाचे डोंगर
तू दिला प्रकाश प्रज्ञासूर्याला
तू दिलेला क्रांतिविचार झाला अजरामर
तू तोडल्या शृंखला वर्ण धर्माच्या
तू दिला सूर्य सुरू झाले क्रांतिपर्व
तुझ्यामुळे झालो आम्ही विद्यापीठ
सावित्रीमाई,
तू ज्योतीरावाची सावली युद्धाई
तू क्रांतिज्योती मुक्ताई
तू केलीस सात समुद्राची शाई
तू लिहिलेस धरतीच्या पाटीवर शाळेत जाई
तुझ्यामुळे लढतोय आम्ही परिवर्तनाची लढाई
सावित्रीमाई ,
समतेच्या जात्यावर
तू दळलीस येथे
रुढी परंपरेचे पीठ
पुष्पहार घेऊन उभे आहे
साविञीबाई पुणे विद्यापीठ
सावित्रीमाई,
तू आहेस क्रांतिसूर्याची माय
तू आहेस हजारो चांदण्याची माय
तू आहेस पाणी महाडचे
तू आहेस आकाश वंचितांचे
तू आहेस आमची लेखणी
तू जगात कर्तृत्वाने ठरली देखणी
तू दिलेल्या शिदोरीने भागविली तहानभूक
तुझ्यामुळे मिळाले युगायुगांचे सुख.
— अजय रामटेके.
3 जानेवारी 2023