प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
कृषी उत्पन्न बाजार समिती मुल अंतर्गत आधारभूत खरेदी योजना २०२४ -२५ नोंदणी उपकेंद्राची सुरुवात ग्रामपंचायत बेंबाळ येथे आजपासून करण्यात आली. ऑनलाइन नोंदणी करता शेतकऱ्यांनी चालु वर्षातील सातबारा, आधार कार्ड, गाव नमुना-८, बँक पासबुकची झेरॉक्स, सातबारा उतारा सामाईक असल्यास संबंधिताचे संमतीपत्र, आणि आधार लिंक मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. सदर योजनेचे ऑनलाइन नोंदणी ग्रामपंचायत बेंबाळ येथे करण्यात येईल.
बेंबाळ ग्रामपंचायत सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, ग्रामपंचायत सदस्य अशाताई शेंडे, आशाताई मडावी, अरुणाताई गेडाम, राकेश दहीकर, कविताताई नंदिग्रामवार, विनोद वाढई तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जालिंदर बांगरे, संचालक सौ.उषाताई शेरकी, योगेशजी शेरकी, दिवाकरजी कडसकर तथा गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बेंबाळ ग्रामपंचायतचे सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार तथा संचालक मंडळ व ग्रामपंचायत कमिटी सदस्यांनी केला.