वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक… 

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

            नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची दर्यापूर तालुक्याची आढावा बैठक दर्यापूर येथिल जि.प. शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.

           बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार उपस्थित होते. तर व्यासपीठावर जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर, सदानंद नागे, अशोक दुधंडे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र तायडे उपस्थित होते.

          यावेळी दर्यापूर तालुक्यातील उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात बूथ बांधणी करणे आहे. आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी पक्ष संघठन करुन यावर चर्चा करण्यात आली.

          अमरावती जिल्ह्यात दर्यापूर विधानसभेत पक्ष एक नंबरवर राहिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे मतदार मागिल निवडणुकीपेक्षा या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

          यावेळी या आढावा बैठकीला प्रविण लाजूरकर, मुरलीधर रायबोले, अतुल नळकांडे, एस एस डोंगरे, शेख सत्तार, इब्राहिम शहा, शेख चांद यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.