सैय्यद ज़ाकिर
जिल्हा प्रतिनिधी वर्धा
हिगणघाट :- हकीकत या प्रमाणे आहे की 16 जुलै 2018 रोजी आरोपी ने फिर्यदी पिडिताला स्वत:चा राहत्या घराच्या आत बोलाऊन घराचा दरवाजा बंद केला व तिचे हात-पाय प्लाॅस्टिकच्या दोरिने बांधुन तिचा विनयभंग केला होता.या घटनेला अनुसरून हिंगणघाट सत्र न्यायालयातील न्यायाधीश महोदयांनी ५ वर्ष सक्तमजूरीच्या शिक्षेसह २८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सदरची बाब कोणाला सांगितल्यास फिर्यादी पीडितिला जीवानीशी मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती.सदर घटनेची फिर्यादीने पोलिस स्टेशन अल्लीपुर येथे तक्रार केल्यानंतर अरोपिविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला व त्याचे विरुद्ध साक्ष-पुरावा मिळून आल्याने अरोपिविरुद्ध दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा बी. पारगावकर हिंगणघाट यांचे न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ होते,सदर प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून एड.दीपक वैद्य यांनी न्यायाधीन काम-काज पाहिले व त्यांनी शासनातर्फे एकुन नऊ सरकारी साक्षदार तपासले व प्रखरपने बाजू माडून युक्तिवाद केला आणि अरोपिविरुद्ध गुन्हा साबित केला.
सदर अपराध पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीत झाला.।अपराध क्र.-202/2018 कलम 354 ब,323,342,354,506 भांदवी सह कलम पोक्सो एक्ट, अंतर्गत आरोपी महेंद्र उर्फ लल्ला उत्तम पालेकर रा,टाकडी(द र ने)ता,देवली जिल्हा वर्धा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे,यांनी तपासे पूर्ण करुन अरोपिविरुद्ध सबळ पुरावे गोडा केले होते.तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हवा राजेन्द्र बेले ब.न.1266 यांनी सदर प्रकरणात विशेष परिश्रम घेतले.
कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा बी. पारगवकर हिंगणघाट यांनी सरकारी पक्ष व आरोपी पक्ष्याचे युक्तिवाद ऐकून अरोपिविरुद्ध भांदवीचे कलम 354 ब,323,342,354,506,सह, पोक्सो अंतर्गत ऐकून 5 वर्षाची करवासाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली व 28 हजार रुपयांचा दंड ठोठावला.दंड न भरल्यास १४ महिन्यांची साद्या कारावासाची शिक्षा ठोठावन्यात अली आहे.
पीड़ितेस 25 हजार रुपयाची नुक्सानभरपाई देण्यात आदेश पारित करण्यात आला..