युवराज डोंगरे/खल्लार
पाणी हे जीवन आहे. जसं माणसांसाठी तस इतर प्राणी मात्रांसाठी सुद्धा. हेच जीवन आवश्यक पाणी कळाशी येथील गुर ढोरांसाठी दुर्लभ झाले होते. कळाशी येथील धर्माळा हा अतिशय बिकट परिस्थितीत होता. त्यामुळे गूरे-ढोरे पाणी पिण्यासाठी वणवण भटकावे लागत असे, पाण्यासाठी भटकंती करत खुप दूरवर जात असल्याने त्यांची चोरीला जाण्याची, दुखापत होण्याची यांची दाट शक्यच राहत असे या सर्व बाबी असून सुद्धा गावातील धर्माळा हा बिकट परिस्थितीतच होता. पण ग्रामपंचायत सदस्य अभिषेक गावंडे यांनी या सर्व बाबींची नोंद घेतली वर त्यावर बाबत ग्रामपंचायत ला निवेदन दिले. व वेळेत काम सुरू न केल्यास ५ डिसेंबर ला ग्रामपंचायत वर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन दि, ०१/१२/२०२२ रोजी लेखी आश्वासन दिले की २ डिसेंम्बर पासून धर्माळा च्या कामाला सुरुवात करू, त्या अनुषंगाने २ डिसेंम्बर पासून ग्रामपंचायत सदस्य यांच्या या प्रयत्नांना यश येत कळाशी येथील कामाला सुरुवात झाली. धर्माळा काम झाल्यावर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा खुप मोठा सुटेल त्यामुळे गावकरी मंडळी खुप आनंदी आहे.