युवराज डोंगरे/खल्लार
दिनांक 3 डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून निवासी मूकबधिर विद्यालय, दर्यापूर येथे दिव्यांग दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे होते.प्रमुख पाहुणे डॉ योगेश देशमुख तहसिलदार दर्यापूर हे उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्याने दर्यापूर मधील अंध विद्यालय व मतिमंद विद्यालय दर्यापूर यांनी सहभाग घेतला.
सकाळी 10 वाजता दिव्यांग विध्यार्थीची फेरी निवासी मूकबधिर विद्यालयाच्या प्रांगणातून काढण्यात आली.प्रभात फेरी रॅलीला दर्यापूरचे प्रभारी ठाणेदार विनायक लंबे यांनी हिरवी झेंडी दाखवित प्रभात फेरीला सुरुवात केली व समारोप कार्यक्रम मूकबधिर विधायलाय मध्ये पार पडला व संपूर्ण विद्यार्थ्यांना मिष्ठान भोजन देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन विनोद गुले, मार्गदर्शन नागे अनिल पाटील , मयूर रोडे , अमोल बोके, मुकेश कातखेडे, यांनी केले व यावेळी अंध विद्यालय व मतिमंद विद्यालय येथील कर्मचारी उपस्थित होते.