रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी 

 

  अहेरी :- तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा (खुर्द) आणि किष्टापुर (दौड़) ह्या तिन्ही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या युवा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली जनतेमधून थेट सरपंच आणि सदस्य पदांसाठी भारतीय जनता पार्टी पॅनलच्या उमेदवारांनी काल तहसील कार्यालय अहेरी येते उमेदवारी अर्ज दाखल केले.

             वांगेपल्ली सरपंच पदासाठी उच्चशिक्षित इंजिनिअर असलेले प्रशांत मडावी, वट्रा (खुर्द) सरपंच पदासाठी शशिकला आत्राम तर किष्टापुर (दौड) सरपंच पदासाठी अमृता तोरैम यांच्यासह तिन्ही ग्रामपंचायतीत सर्व सदस्य पदासाठी भाजपा पॅनलने उमेदवारी अर्ज दाखल केले.ह्यावेळी भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार,अहेरी तालुका महामंत्री पप्पू मद्दीवार, पोशालू सुदरी, उपसरपंच संजय अलोने, माजी पंचायत समिती सदस्य मूलचंद गावडे, माजी सरपंच गोविंदराव सडमेक, रोशन सिडाम, सुनील रापर्तीवार, गुड्डू सलामे, महेश आत्राम सह ह्या तिन्ही गावातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com