कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- काल दिनांक 02/12/2022 रोज शुक्रवारला पारशिवनी तालुक्यातील कोंडासावळी येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ तर्फे भव्य ओपन कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन श्री. चंद्रपालजी चौकसे साहेब (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्राम प्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य तथा पर्यटक मित्र रामटेक) यांचे शुभहस्ते करण्यात आले व श्री. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामच्या वतीने आयोजक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित राजूभाऊ कुसुबे ( शिक्षण सभापती जी.प. नागपूर), चेतन देशमुख (माजी उपसभापती पं.स. पारशिवनी), शालिक ढोंगे, वीरूभाऊ गजभिये, राजू ठाकूर (सरपंच पालासावळी), इंद्रपाल गोरले, दीपक चव्हाण, रामभाऊ ठाकूर, कमलाकर कोटेकर( सरपंच नवेगाव खैरी), उज्ज्वल मिसार, प्रणय ढोंगे, नरेश ढोरे, निखिल ढोंगे, संजय लोखंडे, अरविंद राठोड, कार्तिक ढोंगे, निशांत दुनेदार, अमन तुपट, रितिक तुपट, व गावकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.