प्रतिनिधी, रोशन कंबगौनीवार, राजाराम
राजाराम :- तालुक्यातील गोविंदपुर येथे सुरू असलेल्या अष्ट प्रहार नामयज्ञ तथा भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित दर्शविली.
गोविंदपूर येथील राधाकृष्ण मिलन मंदिरात सार्वजनिक पूजा समितीतर्फे
स्वामी निगमानंद सरस्वती यांच्या जयंती निमित्त गेल्या 27 नोव्हेंबर पासून अखंड महायज्ञ, पदावली कीर्तन, श्रीमद भगवद् कथा, ज्ञान यज्ञ तथा विशाल वैष्णव संमेलनाचे आयोजन करण्यात आले.27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे.
अष्ट प्रहार नामयज्ञ तथा भागवत सप्ताहानिमित्त सार्वजनिक पूजा समिती,गोविंदपूर तर्फे दिलेल्या निमंत्रणाचे मान ठेवत माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी शुक्रवारी आपली उपस्थिती दर्शवुन राधाकृष्ण मंदिरात आशीर्वाद घेतले.तसेच पूजा समिती तर्फे आयोजित विविध कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या. यावेळी सार्वजनिक पूजा समितीतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी पूजा समितीचे अध्यक्ष गौरंग दास, उपाध्यक्ष शिव मंडल, कोषाध्यक्ष देब्रत मंडल, सचिव रामकृष्ण तरफदार, सहसचिव रणजीत मिस्त्री तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.