ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :-
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे उपचारादरम्यान काल २ नोहेंबरच्या रात्री ९ वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले.
तर माजी जिल्हा परिषदचे सभापती रमाकांत ठेंगरी यांचे ही अल्प आजाराने निधन झाले.
रमाकांत ठेंगरी यांचे अंत्यविधी आज रविवारी ३ नोव्हेंबरला त्यांचे मूळ गाव देसाईगंज तालुक्याच्या मोहटोला येथे दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान होणार आहे.
तर हरिराम वरखडे यांचे अंत्यविधी आज रविवारी ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे मूळ गाव आरमोरी तालुक्याच्या जोगिसाखरा येथील रामपुरी मार्गावरील गाढवी नदी तीरावर दुपारी २ वाजे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.