नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी:-
बाळासाहेब सुतार..
बावडा ते नरसिंहपुर तालुका इंदापूर या परिसरामध्ये संकरित व देशी गुरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसू लागलेला आहे. यामध्ये म्हैस काही प्रमाणात आढळून येत नसून इतर जनावरांवर याचा परिणाम जास्त होऊ लागलेला आहे.
या संदर्भात पंचायत समिती गट विकास अधिकारी (बिडीओ) विजयकुमार परीट व तालुका पशु अधिकारी डॉक्टर राम शिंदे यांच्याशी या बद्दल भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला आसता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले आहे की,, संपूर्ण तालुका लंपी रोगमुक्त करण्यासाठी युद्ध पातळीवर काम संबंधित सर्व यंत्रणेद्वारे चालू आहे.
पूर्ण तालुक्यामध्ये औषधाची कमतरता पडणार नाही.गरजे नुसार लागल त्या औषधाचा पुरवठा केला जाईल.याबद्दल सर्व यंत्रणा स्वतः लक्ष घालून लंपी रोगाचा प्रादुर्भाव होऊ देणार नाही असे बिडिओ विजयकुमार परिट यांनी दखल न्यूज भारत सोबत बोलताना सांगितले.
लागेल तेवढा औषधाचा पुरवठा तालुक्यातील प्रत्येक दवाखान्यात दिला जाईल. लंपी आजाराने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी तात्काळ शासन स्तरावर शेतकऱ्यासाठी मदतही केली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे अंगावर गाठी येणे, पाय सुजणे, चारा न खाने, नाकातून चिकट सराव येणे, अंगावर टेंपरेचर जास्त प्रमाणात आसणे, अशी लक्षणे आढळून आल्यास गावातील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जनावरांसाठी पुढील उपाय योजना करून उपचार चालू करावा लंपीच्या जनावरांसाठी खाजगी आथवा शासकीय उपचार चालू आसताना इंजेक्शनच्या सुया बदलून वापर करण्यासाठी डॉक्टरांना सांगावे कारण यापासून दुसऱ्या जनावरांना लंपी रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोग करता येईल,
पिंपरी बुद्रुक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनील हनुमंत ठवरे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवणे व गावामध्ये कीटकनाशक औषध फवारणी करणे गरजेचे तसेच शेतकऱ्यांनी देखील जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गोचीड, गोमाशी, नष्ट करणे यासंदर्भात पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
आज अखेर या कार्यक्षेत्रात पिंपरी बुद्रुक, टणु, नरसिंहपुर, गिरवी, ओझरे, गोंदी, अशा या सहा गावांमध्ये बाधित जनावरांची एकुण संख्या 41 आसून त्यापैकी 30 जनावरे दुरुस्त झालेली आहेत तर तीन जनावरे मृत्युमुखी पडली उर्वरित बारा जनावरांना लंपी रोगाची लागन असल्याने पुढील उपचार चालू आहेत.
फोटो:- ओळी- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे पोपट सुतार यांच्या गाईला लंपी रोगाचा उपचार करीत आसताना डॉक्टर आनील ठवरे..