वाशिम प्रतिनिधी/ आशिष धोंगडे

 

          वाशिम:- कामरगाव पोलीस चौकी हे 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेले कामरगाव या गावाला तीस ते पस्तीस खेडी लागून असल्याने या गावातील नागरिकांना गावात झालेल्या तंटे वादविवाद बाबतच्या तक्रारी या कामरगाव पोलीस चौकी ला होत असतात. कामरगाव सुद्धा वाशिम जिल्ह्यातील हे मोठे गाव असून त्या गावात मागील काही दिवसांपासून वाहन चोरी, घरफोड्या,शेतकऱ्यांचे जनावर चोरीचे प्रमाण वाढले असल्याने व वारंवार वादग्रस्त घटना घडत असल्याचे अनेक वेळा निदर्शनात आले आहे असे असताना अन्याय झालेल्या नागरिकांना दुय्यम दर्जाची वागणूक कामरगाव पोलीस चौकीतून कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिली गेल्या असल्याच्या बातम्या अनेक वेळ प्रसार माध्यमात प्रसारित झाल्या आहे त्यामुळे कामरगाव पोलीस चौकी व गावातील मुख्य चौकात सध्याच्या परिस्थिती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज निर्माण झाली आहे सीसीटीव्ही कॅमेरा लवकर बसवण्यत आल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल त्यामुळे कामरगाव येथील भविष्यात घडणाऱ्या अनुसूचित प्रकाराची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळूवणे सोपे होईल व त्या समाजविरोधी घटनेला आळा बसू शकणार या करता आपणास विनंतीपूर्वक अर्ज पत्रकार राहुल गावंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वाशिम येथे दोन नोव्हेंबरला दिला आहे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सीसीटीव्ही कॅमेरे ची मागणी राहुल गावंडे केली आहे..

 

आशिष धोंगडे

वाशिम प्रतिनिधी

दखल न्युज भारत

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News