युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रवि नवलकार यांची निवड…

 युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

           दर्यापूर तालुक्यातील,पत्रकार दैनिक वऱ्हाड क्रांतीचे संपादक रवि नवलकार  यांची अमरावती युवा ग्रामिण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. 

             युवा ग्रामिण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार रवि नवलकार यांची अमरावती जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून जिल्हाभरातील पत्रकारांशी त्यांचा परिचय आहे.

          दैनिक वऱ्हाड क्रांतीचे संपादक व पत्रकार रवि नवलकार यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा , कृषी तसेच राजकारणी आदि विषयावर नेहमी समाजोपयोगी बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

           अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामिण भागातील पत्रकारांना युवा ग्रामिण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया रवि नवलकार यांनी दिली.

            रवि नवलकार आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामिण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. केतकीताई विशाल पांडे, विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी,अकोला जिल्हा अध्यक्ष रितेश टीलावत यांना देतात.