उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

    उपसंपादक

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ वृंदावन लॉन्स येथे करण्यात आला. या अंतर्गत चार वाहनातून तालुकाभरात योजनेविषयी जनजागृती करण्यासह पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.

         केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत पोहोचविणे, त्या माध्यमातून नोंदणी करणे, लाभार्थीना ‘आभा’ कार्ड वितरित करणे आणि या योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने माहिती देऊन जनजागृती करणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत.

         हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यासाठी ४ नोंदणी व्हॅन एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या सौजन्याने पुरविण्यात आल्या आहेत. राज्यशासन हे मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या माध्यमातून नोंदणी उपक्रम राबविणार असून त्यासाठी प्रत्येक वाहनासाठी ४ स्वयंसेवक मानधन तत्त्वावर नेमण्यात आले आहेत, आदी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आली.

         यावेळी एचडीएफसी बँकेचे विभाग प्रमुख राजा उपाध्याय, पुणे व बारामतीचे सिटी हेड पियूष शेठ, मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसचे समन्वयक कौस्तुभ बुटाला, नरेश चौधरी, संचालक डॉ. मिनल राघमवार, अभियान व्यवस्थापक सुनीता पवार आदी उपस्थित होते.