दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : खेड तालुक्यातील महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र आळंदी व मरकळ, सोळू, धानोरे, केळगाव, चर्होली खुर्द परिसरात भाद्रपद बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकरीवर्गाचा आवडता सण म्हणजे बैल पोळा…. शेतकऱ्यांनी सकाळ पासूनच बैलाना स्वच्छ पाण्याने धुवून शिगांना सोनेरी रंग लावून गळ्यात घुंगर माळ, फुलाचा हार घातला. अंगावर झुल टाकली, बाशिंग व फुगे बांधले, भंडाऱ्याची उधळण करीत फटाक्याची आतषबाजी केली. डिजे, हलगी, ढोल ताशांसह संगीत वाद्य लावून संपुर्ण गावात भव्य मिरवणूक काढली. महाद्वारात आळंदी देवस्थानच्या वतीने बैलांचे पुजन करण्यात आले.
परंपरेनुसार पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला. सर्व परिसरात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहूल चिताळकर पाटील, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, योगेश कुऱ्हाडे, सुनील घुंडरे, केतन गायकवाड, साहील कुऱ्हाडे, सचिन रानवडे, परशुराम वहीले, यांच्या परिवारातर्फे देखील मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला.