दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मूल:- गत वर्षी चंद्रपूर रेतीघाटांचे लिलाव तर झालेच नाहीत. घरकुल धारकांची रेती अभावी मोठी गळचेपी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. जुना रेती वाहतूक परवाना शिल्लक असल्याची ‘ शक्कल’ लढवून जुलै अखेर पावेतो रेती उपसा करण्याची परवानगी देण्यात आली.
याचा फायदा घेत मूल तालुक्यातील रेती चोरांनी भरमार रेती उपसा करून साठा करून ठेवला. तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी यांना हा साठा ‘ अर्थबिंदू’ झाल्याने दिसला नसला तरी तालुक्यात अनेक अवैध रेतीसाठे बघून गोलमाल लक्षात येते.
तालुक्यातील सुशी गावात एका रेतीचोराने रेतीचोरीची हद्द पार केल्याचे स्पष्ट पुणे जाणवते. या चोराची हिंमत एवढी टोकाला गेली की हा बिलंदर बिना नंबरच्या गाडया लावून गत तिनं वर्षांपासून गोरखधंदा करीत असल्याची चर्चा आहे.
सातपुते नामक या च़ोराने अवैध्य रित्या रेतीचा साठा अंदाजित ५०० ब्रास बस स्थानकाच्या मागच्या बाजूला एका स्थानिक जागेवर जमा करून ठेवला आहे. रेती चे घाट मागील २ वर्षापासून लिलाव झालेले नसून रेती सर्वसामान्याला मिळत नाही आणि जर मिळाली तरी दाम दुप्पट, वेळ आली तर तिप्पट भावात विकत घ्यावी लागते. याचा फायदा रेती तस्करी करणाऱ्यांना खूप जास्त प्रमाणात होत असून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडतांना दिसत आहे. बिलंदर रेतीचे तस्कर गावा लगत अवैध् रेतीची साठवणूक करून तीच रेती पावसामध्ये ४००० ते ५००० रुपये ट्रॅक्टर ऐवढ्या मोठ्या दराने विकताना दिसतात यात काही शंका नाही हे परिसरातील चर्चेवरून स्पष्ट होते.
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुलाचे वितरण केले आहे. पण रेतीचोरांनी तिप्पट भावात रेती विक्री सुरू केल्याने घरकुले अर्धवट आहेत. सुशी क्षेत्रात या सातपूते नामक रेती चोराने अवैध साठा करून बांधकामांची पार वाट लावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अंदाजे ५०० ब्रास साठवलेला सुशी गावातील रेतीचा साठा कुणाचा हे महसूल अधिकाऱ्यांना माहिती नसेल असे परिसरातील वाटत नाही. प्रशासनाने हा अवैध रेतीचा साठा जप्त करून गरजू घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा अशी मागणी आहे.