
ऋषी सहारे
संपादक
ग्रामपंचायत आंधळी-नवरगावात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच,उपसरपंच कर्मचारी व नागरिकांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सरपंच उज्वलाताई रायसिडाम,उपसरपंच अप्रव भैसारे,तंटामुक्ती अध्यक्ष संघमित्रा कराडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर नाकाडे,ग्रामपंचायत सदस्य नानाजी खुणे,पुरुषोत्तम किरसाण,नकाराम जांभुळकर, ग्रामसेवक रामटेके,अंगणवाडी सेविका रमावती भैसारे,कुमुद बोदेले,विजू भरणे,भारती लाडे,आरती सहारे,राजू शेंद्रे,रुपेश बोदेले,सतीश नागरे,संगणक चालक सुनील टेम्भूर्णे,मोबाईलझर पुष्पा किरसाण,परिचालक संतोष सयाम,गावकारी व बालगोपाल उपस्थित होते.
जयंती दिनाच्या औचित्याने गावात “कचरा मुक्त भारत, स्वछता ही सेवा” उपक्रम राबविण्यात आले.