चेतक हतीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

धारगाव : भंडारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी गठीत झाली असून दिनांक 27/9/2022 रोज मंगळवार ला जिल्हा परिषद भंडारा येथे श्री. विलास भाऊ कुमरवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा सभा घेण्यात आली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन देण्यात आले आढावा सभा संपल्यानंतर, जिल्हाध्यक्ष श्री हेमराजजी वाघाडे आणि जिल्हा सचिव श्री. माणिकजी लांबट यांनी राजीनामा दिल्यामुळे भंडारा जिल्हा कार्यकारणी ची विषेश सभा राज्याध्यक्ष श्री. विलासभाऊ कुमरवार साहेब यांना तशी सूचना दिली , सर्वानुमते निर्णय घ्या असे मार्गदर्शन केल्याने नागपूर विभागीय उपाध्यक्ष श्री.मारोतीजी चेटुले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 2/10/2022 रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय मानेगाव/सडक येथे जिल्हा सभा आयोजित करण्यात आली आणि सभेमध्ये जिल्हा कार्यकारणी नव्याने पुनर गठीत करण्यात आली त्यामध्यें जिल्हा अध्यक्षपदी श्री. रूपेश वासुदेव बोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. मारोती जी चेटुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव पदी श्री. शरद शामराव कायते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच मार्गदर्शक म्हणून श्री.हेमराजजी वाघाडे यांची निवड करण्यात आली. श्री. राजेशजी दिवटे सहसचिव. श्री. देवेंद्र लांजेवार संघटक प्रसिद्धी. सौ. माहेश्वरी फंदे महिला संघटक. खालील सदस्य गण = आनंदराव पेलने. श्री. सिताराम खंडाईत. श्री. दिलीप हाडगे. श्री. ज्ञानेश्वर मेश्राम. श्री. कैलास नान्हे. श्री. धनराज शहारे. श्री. हिरालाल बारापात्रे. सौ. उषा घाटोळे तसेच तुमसर तालुका अध्यक्ष सचिव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com