सावली (सुधाकर दुधे)

 

 :भारतीय स्वातंत्र्याचा ईतिहास डोळ्यासमोर ठेवले असता स्वांतत्र्याच्या लढाईत अनेक थोर नेते,महापुरुष यांचे बलीदान आहे, यात महात्मा गांधी ,जवाहरलाल लाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक ,सुभाष चंद्र बोस ,राजगुरू ,भगतसिंग आदी चा समावेश आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची भुमिका महत्त्वाची होती,मवाळ व जहाल असे दोन कांग्रेस नेत्यांचे होते, असे असताना कांग्रेस चे प्रमुख नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अहिंसा, सत्य, असहकार, स्वदेशी आदी विचारांची मुहूर्तमेढ रोवून स्वातंत्र्य मिळवून दिले,त्यांच्या विचारानेच लोकशाही राष्टांची निर्मिती झाली असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री ,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वड्डेटिवार यांनी केले ,ते “गांधीजी के रास्ते” पदयात्रेच्या सावली येथील चरखा संघ कार्यालय येथे आयोजित समारोपीय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.

    गांधीजी के रास्ते पदयात्रा ,ची चंद्रपुर ते सावली असा पद प्रवास करुन समारोपीय कार्यक्रम सावली येथील चरखा संघ कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कांग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवताळे, तर प्रमुख अतिथी माजी आमदार नामदेव उसेंडी जिल्हा अध्यक्ष प्रोफेशनल कांग्रेस मनिष तिवारी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सचिव संदीप गड्डमवार, चंद्रपूरशहर कांग्रेस अध्यक्ष रामु तिवारी, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार, नगराध्यक्ष लता लाकडे, कांग्रेस सेवादल चे प्रकाश अर्जुनवार, घनश्याम मुलचंदानी ,स्वाती त्रिवेदी., जिल्हाध्रक्ष महिला कांग्रेस नम्रता ठेमस्कार, उपाध्यक्ष न.प. संदीप पुण्यपवार,शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार आदी उपस्थित होते..

         

    गांधींजीचे विचार व मुल्य,यांचा प्रचार प्रसार करणे, चरखा खादीचे महत्त्व सांगणे,राष्ट्र भावना जनमानसात रुजविण्यासाठी पदयात्रचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी भाषणात सांगितले.

   30 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर पासुन सुरु झालेली पदयात्रा चंद्रपुर ते सावली असा प्रवास करीत ,सावली येथे आली व समारोपीय कार्यक्रम करण्यात आला .

    कार्यक्रम माची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष नितिन गोहणे यांनी केले ,कार्यक्रमा दरम्यान तीन दिवस सुरु असलेल्या पदयात्रेत सहभागी 30 पदयात्रींचा आमदारा़च्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आले, 

  सदर कार्यक्रमासाठी कांग्रेस चे नितीन गोहणे, ,उषा भोयर, नितीन दुवावार, नगरसेवक प्रितम गेडाम, तसेच मोहन गाडेवार निखिल सुरमवार ,पिंटु गड्डमवार, गुणवंत सुरमवार ,तथा सर्व नगरसेवक ,कार्यक्रर्ते आदींनी परीश्रम घेतले…

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com