हनुमान नगर कन्हान येथील सार्वजनिक वाचनालयच्या सभागृहात राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 पारशिवनी:- काल सायंकाळला सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या ३४९ वी पुण्यतिथीचा कार्यक्रम कन्हान तालुक्यातील पारशिवनी येथे संपन्न झाला.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.देवरावजी कावळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.गंगाधरजी अवचट होते.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन केले आणि प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.

     यानंतर सर्व उपस्थित सभासद व वाचक,पाठक यांनी पुष्प अपर्ण करून श्रध्दांजली वाहिली.सर्व उपस्थीत सभासद व वाचक,पाठक यांनी दोन मिनीटे उभे राहून मौन धारण करून सामुहिक श्रद्धांजली वाहली. 

        या प्रसंगी श्री.अभिषेक निमजे,श्री राहुल पारधी,श्री. बेलेकर यांनी राष्ट्रमाता-राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमाचे संचालन श्री. शाम भाई ग्रंथपाल यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.कृणाल कोल्हे लिपीक यांनी केले. 

       वरिल कार्यक्रमाप्रसंगी श्री. मनोहर कोल्हे सचीव,श्री राहुल पारधी,श्री.बेलेकर,सिमा देवढगले,श्रीमती अल्का कोल्हे इत्यादी सभासद व वाचक,पाठक बहुसंख्येने उपस्थित होते.