चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

 

धारगाव : कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने व तालुका कृषी विभाग भंडारा यांच्या मार्गदर्शनात मंडळ पहेला अंतर्गत येणाऱ्या गाव टेकेपार, माडगी, खुर्सीपार येथील शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक देवानंद जवंजार यांनी कीटकनाशकांची सुरक्षित हाताळणीचे योग्य प्रकारे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले.

 

दरवर्षीच चुकीच्या पद्धतीने कीटकनाशकांचा वापर व हाताळणी केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटना घडले आहेत, त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत व हा मृत्युदर कमी करून शेतकऱ्यांना याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय लाभदायी ठरत आहे.

 

फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण करण्यात आले.कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीच्या आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी व सर्वसाधारण व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात. तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.फवारणी करतांना संरक्षक कपडे ,बुट ,हातमोजे ,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.

 

बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी – कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा ,डोके,श्वसनेंद्रिया द्वारे विषबाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास झाल्यास अपघात स्थानापासून दूर न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे.रोग्याचे अंग /बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. व कोरड्या टॉवेलने पुसावे. कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी. रोग्याला पिण्यासाठी बिडी / सिगारेट व तंबाखू देऊ रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे.रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून घ्यावे.रोग्याचा श्वासोच्छ्वास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु करावा.रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातांमध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.रोग्याला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे. डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.

 

प्रात्यक्षिक दरम्यान उपस्थित सरपंच गणेश चेटूले, ग्रामसेवक प्रदीप चेटूले, कृषी मित्र वामनराव शेंडे, केवळराम मने, सिताराम शिडामे, ईस्तारी कहालकर, विजय कायते, विजय फेंडर, राजू फेंडर, राजू शेंडे, शिशुपाल चेटूले व शेतकरी बांधव उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com