सावली (सुधाकर दुधे)

 

सावली तालुक्यातील उसेगाव येथे दिनांक ३०/०९/२०२२ ला लोकहीतपयोगी विविध विकास कामाचे भूमिपूजन

 

 ब्रह्मपुरी क्षेत्राचे लाडके आमदार

 

 आदरणीय श्री. विजय भाऊ वडे्टीवार यांच्या हस्ते पार पडले

     विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत बौद्ध वस्तीत 15 लक्ष रुपयांच्या निधीतून समाज मंदिर बांधकाम, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत 10 लक्ष रुपयाच्या निधीतून गावात सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम व नालीचे बांधकाम, जलमिशन अंतर्गत ऊसेगाव येथे 70 लक्ष रुपयाच्या निधीतून पिण्याच्या पाण्याची योजना इत्यादी विकास कामाचा प्रामुख्याने समावेश आहे.

      दौऱ्या दरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक व युवा मित्रांशी चर्चा करून पुढे सुद्धा मागणी करण्यात आलेल्या सर्व कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याचे वचन गावकऱ्यांना दिले आहे. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमच्या क्षेत्राचे लाडके आमदार श्री. विजय भाऊ वडेट्टीवार, प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिनेश पाटील चिटनुरवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. राम मेश्राम , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री नितीन भाऊ गोहणे, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ. लताताई लाकडे, काँग्रेस शहर अध्यक्ष श्री. विजय भाऊ मुत्यालवार, ऊसेगाव चे सरपंच मा. चक्रधर दुधे, उपसरपंच मा. सुनील पाल, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. रामदास गोहने, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण ग्रामपंचायत ऊसेगाव चे सचिव मा. कुंभारे व गावातील माजी पदाधिकारी तसेच सर्व गावकरी मंडळी यावेळी आवर्जून उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com