उपसंपादक/अशोक खंडारे
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी, जिल्हा गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकारातून गरजूंसाठी माणुसकीची भिंत असा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे
.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॕ.राजकुमार मुसणे ,सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी तथा रासेयो स्वयंसेवकांच्यावतीने परिसरातील जनतेंना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्याकडील जुने कपडे ,पुस्तके, खेळणी जे गरजूंना उपयुक्त ठरू शकतील असे साहित्य,गरजूंना दिलासा मिळून चेहऱ्यावर हास्य फुलण्यासाठी विविध वस्तू महाविद्यालयाला द्यावी.राष्ट्रीय सेवा योजना विभाग या सगळ्या वस्तू गरजूपर्यंत पोहोचवेल, गांजलेल्या ,वंचित ,उपेक्षित, गरीबांच्या जीवनामध्ये हास्य फुलविण्यासाठी मदतीचा हात देण्याचे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.