ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर इथे शिष्यवृत्ती योजना व लोक कल्याणकारी योजना विषयी तालुका स्तरीय मेळावा संपन्न…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- दि. 30/08/2024 ला ग्रामगीता महाविद्यालय चिमूर इथे विद्यार्थी शिष्यवृत्ती समिति, एससी/ एसटी सेल, ओबीसी सेल, मायनॉरिटी सेल, समान संधि केंद्र व इतर मागास बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर द्वारा शिष्यवृत्ती योजना व लोक कल्याणकारी योजना विषयी तालुका स्तरीय मेळावाचे आयोजन करण्यात आले.

           या कार्यक्रमाला श्री. एच. जी. चुकलवार (एच. म.), श्री. बी. एम. पवार, श्री. वी. एम. कांबळे, श्री. एच. पी. कलाम (सर्व आश्रम शाळा, जिवती, चंद्रपूर), श्री. एम. डुले (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, चिमूर), श्री. अमोल सोनटक्के (इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, चंद्रपूर) प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते. 

          कार्यक्रम ची सुरूवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. प्रस्तावना मधे श्री. एच. जी. चुकलवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभाग बद्दल माहिती दिली.

          त्यांनी सांगितले की विद्यार्थी हा आर्थिक परिस्थिति मुले शिक्षण घेत नाही त्या साठी शासनाद्वारे विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेऊन शिक्षण पूर्ण केला पाहिजे. श्री. अमोल सोनटक्के यांनी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ द्वारा मिळणारी योजना विषयी सांगितले. इतर मागसवर्गीयांच्या विकासासाठी कृषि विकास, लघुउदयोग आणि अन्य व्यवसाय यासारखे अनेक योजणा वर मार्गदर्शन केले. श्री. एम. डुले यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प द्वारे चालवल्या जाणाऱ्या आश्रम शाळा व निवासी शाळे विषयी सांगितले. यांच्या विकासासाठी दिले जाणारी संबळीकरण व स्वाभिमान योजना, कौशल्य विकास योजना, आदिमजमाती साठी विकासाच्या योजना, पंडित दीनदयाल योजना यांच्यावर मार्गदर्शन केले.

           श्री. एच. पी. कलाम यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागा तर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती योजणा बद्दल माहिती दिली. यांनी वसतिगृह संबंधी, शिष्यवृत्ती योजना, धनगर समाजाच्या विकासासाठीच्या योजना व इतर योजणा वर मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एच. डी. आनंदे, प्राचार्य, ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर यांनी आपल्या मार्गदर्शना मधे शिक्षणासाठी व परदेशात उच्च शिक्षणासाठी दिले जाणारी शिष्यवृत्ती, पीएचडी करतांना मिळणारी कनिष्ठ व वरिष्ठ संशोधन फेलोशिप याबद्दल सांगितले.  

           कार्यक्रमाचे आयोजन व संचालन विद्यार्थी शिष्यवृत्ती समिति चे समन्वयक डॉ. मृणाल वऱ्हाडे यांनी केले आणि आभार डॉ. सुमेध वावरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतणे करण्यात आली.