ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये CTET व TET च्या नावाखाली जिल्ह्यातील बेरोजगार डीएड, बिएड धारकांना डावलून मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील अर्ज स्वीकारण्यात आले. असून प्रसिद्ध झालेल्या यादीत 70 ते 80 टक्के बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात आल्याचे दिसून येते, हा जिल्ह्यातील बेरोजगारांवर पुन्हा एकदा अन्याय होत असल्याचा आरोप बेरोजगार संगठना व आझाद समाज पार्टी च्या वतीने करण्यात आला आहे. हा अन्याय जर थांबला नाही तर बेरोजगार संघटना निवडणुकीच्या रिंगणात सुद्धा उतरणार असेही यावेळी सांगितले.
त्यामुळे शिक्षक दिनी 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी च्या वतीने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार व खासदार हे कुणीही बेरोजगारांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने यांचा निषेध करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालण्यात येणार आहे. जो पर्यंत शिक्षणमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचेशी कॉन्फरेन्स वर बोलणे होणार नाही तो पर्यंत जिल्हा परिषदेच्या दरवाजातून हटणार नाही असा इशारा निवेदनातून सीईओ ना देण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, जिल्ह्यातील अनेक जण पात्र असून सुद्धा भोंगळ कारभारामुळे अपात्र यादीत नाव आले त्यांना न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील बेरोजगारांना घेऊन आझाद समाज पार्टी लढा देणार असे आवाहन करत, 5 सप्टेंबरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने जनतेने सहभागी होण्याचे आवाहन बेरोजगार संघटना व आझाद समाज पार्टी ने केले.
यावेळी निवेदन देताना उपस्थित बेरोजगार युवकांसोबत आसपाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे. आदी उपस्थित होते..