श्रीकृष्ण जन्माष्टमी 2024 चा महोत्सव आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) पंढरपुर अंतर्गत शाखा अकलूज यांच्या वतीने संपन्न झाला. 

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

अकलूज तालुका माळशिरस येथे कृष्णप्रिया मल्टीफंक्शन हॉल संग्रामनगर अकलूज येथे भगवंताच्या नाम घोषात

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे I

हरे राम हरे राम राम राम हरे हरे II

भक्ती भावाने संपन्न झाला. 

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन II गीता (4.9)

          भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म आणि कर्म याचे रहस्य जो जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही तो मला प्राप्त होतो. 

          आम्ही दरवर्षी अकलूज व ईतर परिसरातील भाविक भक्तांना भगवान श्रीकृष्णांची कृपा आशीर्वाद मिळावा म्हणुन या श्रीकृष्ण जन्माष्टमी महा महोत्सवाचे आयोजन करत असतो.यंदाचे आठवे वर्ष आहे. या कार्यक्रमात श्रद्धाळू भाविक भक्तांनी भगवान कृष्णांचा महाभिषेक केला.

           तसेच मुलाच्या आध्यात्मिक प्रगती साठी चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम भरतनाट्यम नृत्य याचे आयोजन केले होते. त्याचबरोबर भगवदगीता आणि ईतर आध्यात्मिक ग्रंथाचा स्टॉल उपलब्ध केला होता.

        सुमारे 2000 लोकांनी भगवंताच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आम्ही संत सावतामाळी मंदीर माळेवाडी येथे दर शनिवारी सत्संग आयोजित करत असतो. त्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. अशी माहिती अकलूज प्रचारप्रमुख श्रीमान मोहनरूप प्रभूजी यांनी दिली. 

          या महोत्सवात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील तसेच वरीष्ठ तज्ञ डॉक्टर इनामदार आणि डॉक्टर देवडीकर मॅडम आणि माळीनगरचे सुभाष दादा निंबाळकर – पाटील आणि हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भाविक भक्त उपस्थित होते. 

            कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी गजेंद्र फुले, गणेश फुले, दयाळू विठोबा प्रभू, प्रमोद लोखंडे आणि अकलूज येथील सर्व भक्त प्रभूजी आणि मातृ शक्तींनी खूप मेहनत घेतली होती.