उमेश कांबळे ता प्र भद्रावती :
तालुक्यातील गट ग्रामपंचायत कढोली अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच अजित निळकंठराव फाळके यांची अविरोध नियुक्ती करण्यात आली.ही नियुक्ती ग्रामसभा अध्यक्ष शशिकला इंगोले यांचे अध्यक्षतेखाली अविरोध करण्यात आली.
या नियुक्तीबद्धल फाळके यांनी किलोनी,कढोली, कुरोडा व बोनथळा या गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.या नियुक्तीचे गणेश जिवतोडे, आकाश वानखेडे,सचिन डुकरे,गणेश इंगोले,नत्थुजी गाडगे, ललिता आत्राम,प्रकाश आडे, सरपंच शशिकला इंगोले,उपसरपंच माधुरी डूकरे,प्रकाश कुळमेथे,अजय टेकाम,सोनू मंगाम,गणपत टेकाम,काकडे पाटील,महादेव टेकाम व आदींनी अभिनंदन केले.