ऋषी सहारे

संपादक

 

 

        आरमोरी शहर हे जिल्ह्यातील महत्वपूर्ण व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे शहर आहे. जवळपास ५०००० लोकसंख्या असलेल्या आरमोरी शहरात यापूर्वी युवामंच सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्नानेच १०८ रुग्णवाहिका दाखल झाली होती. परंतु कोरोनाकाळात रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे एक रुग्णवाहिका रुग्णांची सेवा देण्यात अपयशी पडत होती. याची दखल घेत युवामंच चे सदस्य नंदु नाकतोडे व पंकज खरवडे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी रेटून धरली व सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि आरमोरी शहरात सुसज्य अशी रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल झाली. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्याने या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते नगरपरिषद आरमोरी येथे करण्यात आले. यावेळी आरमोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदर पंजवानी, मुख्याधिकारी डॉ.माधुरी सलामे, न. प. आरोग्य सभापती भारत बावनथडे, न.प. पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, न. प. बांधकाम सभापती सागर मने, युवामंच चे नंदु नाकतोडे, पंकज खरवडे, अमोल खेडकर, जितेंद्र ठाकरे, रोहित धकाते, अमित राठोड, संजय सोनटक्के, अक्षय हेमके, गोविंदा भोयर, प्रसाद साळवे, रुपेश पुणेकर, विवेक रोडगे, टींकु बोडे, विनोद जवंजालकर, प्रफुल निंबेकार, थामेश्र्वर मैंद, भा.ज.पा.तालुकाध्यक्ष नंदु पेट्टेवार, नगरसेवक मिथुन मडावी, नगरसेविका प्रगती नारनवरे, सुनीता चांदेवार, सुनीता मने, गीता सेलोकर, शहर अभियंता अविनाश बंडावार, पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे, विद्युत अभियंता कौस्तुभ रोक्कमवार, कार्यालयीन अधीक्षक आशिष हेमके ई. तसेच युवामंच चे कार्यकर्ते आणि नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    समाजकार्यात अग्रणी असलेली युवामंच ही सामाजिक संघटना नेहमीच सर्वसामान्य लोकांना उपयोगी अशे उपक्रम आरमोरी शहरात व तालुक्यात राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणुन त्यांनी आरमोरिकरांसाठी ही रुग्णवाहिका मिळवुन दिली यामुळे सर्वत्र युवामंच या सामाजिक संघटनेचा कौतुक होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com